चावी मास्टर
एक साधी धुणं वाळत घालायची काठी. किंवा नुसतीच अडीअडचणीला कामाला येणारी भक्कम कळकाची काठी. कोपऱ्यात निमूट उभी असते. कामाला मात्र तत्परतेनं हाती येते.
ती धुणं वाळत घालते. तारेत अडकलेला पतंग काढण्यासाठी पोरासोरांच्या संगतीनं मैदानात उतरते. पलंगाखाली घरंगळत गेलेली आजोबांची अमृतांजन किंवा टायगर बामची बाटली काढायला तत्परतेनं पुढे येते. कौलारावरचा भोपळा उतरवण्यासाठी पुढाकार घेते. कैऱ्या लगडल्या की डोक्याला आकडा बांधून झाडाच्या फांदोऱ्यात बिनदिक्कत घुसते.
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी App Download करा.
Android: https://fxurl.co/Q4S0c