
स्टेफनी फाईट, चीफ क्युरेटर ऑफिसर, श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम
आयुर्वेदिक दिनचर्येचे पालन केल्यास तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतात. आपल्याला एखाद्या पदार्थाची पाककृती व्यवस्थित माहीत असल्यास तो करणे सोपे होते, त्याप्रमाणे जीवनाविषयी काही नियम, आचारसंहिता माहिती असल्यास ते जगणे अधिक सहज आणि आरोग्यदायी होते.
नित्यक्रमाचे पालन केल्याने शरीराला चांगल्या सवयी लावण्यासाठी सहजतेने शिस्त येते. आयुर्वेदाचा अभ्यास करणारे आपले ऋषी आरोग्य आणि निरोगीपणाच्या दृष्टिकोनातून ज्ञानी आणि जाणकार होते. त्यांनी मानवाने निरोगी जीवन जगण्यासाठी एक प्रणाली तयार केली. उत्तम आरोग्यासाठी ती उपयुक्त आहे. निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ही शिकवण आजही उपयुक्त आहे.
दिनचर्या हा शब्द संस्कृतमधून आला आहे. ‘दिन’ म्हणजे दिवस आणि ‘चर्या’ म्हणजे दिनचर्या किंवा पथ्ये. आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य हे नैसर्गिक चक्रांशी घट्ट जोडलेले आहे, हे दिनचर्येचे तत्त्वज्ञान मुख्य तत्त्वज्ञान आहे. आपल्या दैनंदिन क्रियाकलापांना या नैसर्गिक लयांसह निश्चित करून, आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो.
स्टेफनी फाईट
दोष आणि तुमची दैनंदिन दिनचर्या
आयुर्वेदानुसार, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा किंवा ‘दोष’ असतात. वात, कफ आणि पित्त हे तीन दोष निसर्गाच्या घटकांशी संबंधित आहेत. अधिक तपशीलवार माहितीसाठी वरील चार्ट पाहावा.
वात : पहाटे २ ते ६ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६
वात दोष हवेशी संबंधित आहे. या कालावधीत हालचाल आणि सर्जनशीलता वापरणे आवश्यक आहे.
कफ : सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १०
कफ वाताच्या हलकेपणाला संतुलित करतो. सहसा हलके काम करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
पित्त : सकाळी १० ते दुपारी २ आणि रात्री १० ते मध्यरात्री २
पित्ताचा संबंध अग्नी आणि पाणी या दोन्हींशी आहे. म्हणजे उच्च ऊर्जा. जागृत अवस्थेत असताना यामुळे उच्च उत्पादकता वाढते. झोपेत असताना हे आंतरिक अवयवांमध्ये तयार होत असते. त्यामुळे चयापचय प्रणाली शुद्ध करण्यासाठी कार्यरत असते.
सकाळची कार्यप्रणाली
सकाळच्या नित्यक्रमातील सर्वांत महत्त्वाच्या कार्यांपैकी एक म्हणजे शरीरातील कचरा काढून टाकून पुढील जेवणासाठी शरीर तयार करणे. ‘कचरा’ म्हणजे लघवी, विष्ठा आणि घाम. त्याचबरोबर भावना, भ्रम यांसारख्या मानसिक कचऱ्याचाही यामध्ये समावेश होतो.
दिवसाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी मुख्य तत्त्वांपैकी महत्त्वाचे एक म्हणजे सूर्योदयापूर्वी जागे होणे. याचा अर्थ असा, की दिवसाच्या वात कालावधीत उठणे. हा काळ आत्मचिंतन आणि ध्यानासाठी योग्य आहे.
आपण दिवसभरासाठी सकारात्मक पद्धतीने कार्य किंवा दैनंदिन कामकाज निश्चित करू शकतो आणि स्वत:ची काळजीही चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
तुमच्या सर्वांगाला हलकेपणाने मसाज करा. त्याचबरोबर पूरक आहार घ्यावा.
सूर्योदयानंतर आणि सकाळी ६ ते १० या दरम्यानचा कालावधी हा दिवसाचा ‘कफ कालावधी’ मानला जातो. या काळात, योगासने किंवा बाहेर फिरायला जाण्यासारखे हलके व्यायाम करावेत. यामुळे तुमच्या रक्ताभिसरणात सुधारणा होऊन मूड व्यवस्थित करण्यास मदत होते.
सकाळपासून दुपारपर्यंतचा कालावधी
सकाळी १० ते दुपारी २ दरम्यानचा काळ हा दिवसाचा पित्त कालावधी आहे. योग्य पद्धतीने कार्यक्षम राहण्यासाठी आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या वेळेत तुमची बहुतांश कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या काळामध्ये भरपेट जेवण घेणे सर्वोत्तम मानले जाते. कारण तुमची पचनसंस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असते. दुपारचे जेवण झाल्यानंतर आणि ५-१० मिनिटे शांत बसावे आणि शांत संगीत ऐकावे.
संतुलित दुपारसाठी काही टिप्स
दुपारच्या काळात तुम्ही वात कालावधी अनुभवत असता. दुपारी २ ते ६ वाजता या कालावधीत तुम्हाला तुमच्यातील ऊर्जेची पातळी आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाल्याचे लक्षात येईल. या काळात सर्जनशीलता उच्च पातळीवर असते. या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. अर्थात आणखी एक भाग म्हणजे एकाग्रतेची आवश्यकता नसलेल्या कामात स्वतःला गुंतवून घ्या.
शांततेसाठी संध्याकाळचा दिनक्रम
संध्याकाळी ६ ते १० या वेळेत, कफ पुन्हा सक्रिय होतो. त्यामुळे याकाळात तुम्हाला स्वत:ची काळजी घेण्याची आणखी एक उत्तम संधी मिळते. या दरम्यान हळदीचे दूध घेऊ शकता. कुटुंबीयांसोबत किंवा प्रियजनांसोबत घालवण्याचा, एकत्र हलक्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी आणि रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी देखील हा चांगला कालावधी आहे.
तुम्ही झोपल्यावर दिनचर्या थांबत नाहीत!
झोपेच्या नियमित वेळापत्रकाचे निरीक्षण करणे आणि रात्री १० वाजेपर्यंत झोपेचे लक्ष्य ठेवणे अतिशय आरोग्यदायी असते. चांगल्या झोपेच्या कालावधीत शरीर दिवसभरात घेतलेल्या पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करते आणि मन शांत होते. मध्यरात्रीपर्यंत जागे राहणे टाळा. कारण यामुळे पित्त आणि वात वाढतात.
आपापल्या सोईनुसार उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपावे. उजव्या बाजूला झोपणे आरामदायी आहे. कारण डाव्या नाकपुडीमुळे शरीराला आराम आणि थंडावा मिळतो. अनेक योगसाधक झोपेचा हा नियम पाळतात. डाव्या बाजूला झोपल्याने उजव्या नाकपुडीच्या कार्याला चालना मिळते. उजवी नाकपुडी शरीराला गरम करते आणि सक्रिय करते. पाठीवर किंवा पोटावर झोपण्याची शिफारस केलेली नाही. कारण ही पद्धत निरोगी श्वासोच्छ्वासात व्यत्यय आणू शकते आणि ऊर्जा सहजपणे शरीरातून बाहेर पडते. झोपताना शक्यतो पूर्वेकडे डोके असावे कारण यामुळे गाढ झोप मिळू शकते. उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने शरीरातून ऊर्जा बाहेर पडून नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
पहाटे ५ : ००
योग्य प्रारंभया वेळेत झोपेतून जागे झाल्यामुळे ब्रह्म मुहूर्त/अमृत काळामध्ये दैवी वैश्विक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे सूर्योदयाच्या किमान दीडतास आधी उठावे. त्यातून चांगली दिनचर्या सुरू होते. दिवसाची सुरुवात किमान दोन ग्लास पाणी पिऊन करावी. शक्यतो तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी साठवून ठेवावे आणि झोपेतून उठल्यावर सहज हाताला लागेल अशा ठिकाणी पाणी ठेवावे. हे पाणी सकाळी सर्वांत आधी प्यायल्याने आतड्याची हालचाल चांगली होण्यास मदत होते.
पहाटे ५ : १५
मुखमार्जन
मुखमार्जन करून तुमच्या दिवसाची सुरुवात करावी. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि तोंडाच्या आरोग्याला चालना देण्यासाठी एक चमचा तीळ किंवा खोबरेल तेल काही मिनिटांसाठी तोंडात ठेवा. रात्रभर साचलेली आणखी विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी जीभ स्वच्छ करा.
पहाटे ५ : ३०
नाकाची स्वच्छता आणि तेलाने मसाज
नाकाची स्वच्छता करून नाक आणि कानात काही थेंब औषधी तेल घालावे. सर्वांगाला तेल लावून अभ्यंग करावे. आपले आयुर्वेदिक गुरू चरक यांनी यावर अभ्यासपूर्ण टिपणी केली आहे. चांगले तेल लावल्यावर यंत्र योग्य पद्धतीने काम करते, त्याचप्रमाणे शरीराला तेलाने योग्य पद्धतीने मसाजाने चालना मिळते. दीर्घायुष्यासाठी हे उपयुक्त आहे. शक्यतो कमीतकमी १०-२० मिनिटे आणि जास्तीत जास्त ४५ मिनिटे (ही वेळ आदर्श आहे) तेलाने सर्वांगाला अभ्यंग करावा.
पहाटे ६ : ००
प्राणायाम आणि ध्यानधारणा
मनाला केंद्रस्थानी ठेवत आणि आंतरिक शांती जोपासण्यासाठी प्राणायाम (श्वासोच्छवासाचे व्यायाम) आणि ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. दररोज १५-२० मिनिटे दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा सराव करा आणि त्यानंतर मन शांत करण्यासाठी तसेच मनाला प्रोत्साहन देण्यासाठी ध्यानधारणा करा.
पहाटे ६ : ४५
योगासने आणि व्यायाम
शरीराला जागृत करण्यासाठी आणि लवचिकता, सामर्थ्य आणि चैतन्य वाढवण्यासाठी सोपी योगासने करावीत. आपल्या नित्यक्रमात व्यायामाचा समावेश करा. तुमच्या शरीराच्या गरजा आणि क्षमतांचा आदर करणाऱ्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवता येईल. त्यातून मनात आणि शरीरात जागरूकता निर्माण होईल.
सकाळी ७ः १५
न्याहारी, व्यायाम
पौष्टिक नाष्टा करण्यावर भर द्या. फळे, सुकामेवा यांसारख्या संपूर्ण पदार्थांचा समावेश असलेल्या पौष्टिक न्याहारीचा आनंद घ्या. पचायला सोपे आणि कायमस्वरूपी ऊर्जा देणारे पदार्थ न्याहारीसाठी निवडा. मनापासून खा, प्रत्येक घासाचा आस्वाद घ्या. तुमच्या शरीराच्या भूक आणि तृप्ततेच्या संकेतांकडे आवर्जून लक्ष द्या.
सकाळी ८ :००
दैनंदिन कार्यक्रम
दैनंदिन क्रियाकलापांमध्ये व्यग्र राहा, मग ते काम असो, अभ्यास असो किंवा घरातील काम असो. त्यावर लक्ष केंद्रित करा. सर्व काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सकारात्मक पद्धतीने विचार करा.
दुपारी १२:००
दुपारचे भोजन
तुमची ऊर्जेची पातळी वाढविणारे आणि आणि योग्य पद्धतीने पचन होईल असे दुपारचे जेवण घ्या. ताजे अन्न घेण्यास प्राधान्य द्या. यामध्ये भाज्या, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश असावा. अन्नाच्या चवींचा आणि पोताचा आस्वाद घेत हळूहळू आणि मनापासून जेवण करा. यासाठी पुरेसा वेळ द्यावा.
दुपारी १ : ००
विश्रांती आणि आराम
दुपारच्या जेवणानंतर विश्रांतीसाठी आणि आराम करण्यासाठी थोडा वेळ द्यावा. आरामदायी स्थितीत हलकी डुलकी काढा. पचन सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वास किंवा ध्यानाचा सराव करा.
दुपारी २ : ००
दुपारची कार्यमग्नता
शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपली दैनंदिन कार्यमग्नता पुन्हा सुरू करा. आवश्यकतेनुसार लहान ब्रेक घ्यावा. त्यामुळे ऊर्जा संचय होऊन पुढील कार्यासाठी ताजेतवाने होऊ शकतो.
सायंकाळी ५ : ३०
सायंकाळची भटकंती
निसर्गाशी जोडण्यासाठी बाहेर फेरफटका मारा. आपल्या सभोवतालच्या सौंदर्याकडे आणि आपल्या पावलांच्या सुखदायक लयीकडे अवश्य लक्ष द्या. आणि त्यासाठी मनात चांगले विचार आणून ते करण्यासाठी मनाला बजावा.
सायंकाळी ६ : ००
रात्रीच्या भोजनाची तयारी
तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयींना समर्थन देणारे हलके, पौष्टिक जेवण तयार करण्यास सुरुवात करा. पचायला सोपे आणि शांत झोपेला प्रोत्साहन देणारे पदार्थ निवडा.
संध्याकाळी ७ : ००
भोजन
प्रियजनांसोबत सकस जेवणाचा आनंद घ्या, एकत्र दर्जेदार वेळ आणि अर्थपूर्ण चर्चा यांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जेवणाच्या चवींचा आणि पोतांचा आस्वाद घेत हळूहळू आणि मन लावून खा.
रात्री ८:००
विश्रांती
आरामदायी कामात स्वतःला गुंतवून ठेवा. उदा ः वाचन, संगीत ऐकणे किंवा शांत झोपेसाठी तुमचे शरीर आणि मन तयार करण्यासाठी सौम्य योग किंवा ध्यानाचा सराव करणे.
रात्री ९ : ००
झोपण्याची पूर्वतयारी
झोपण्याच्या वेळेची दिनचर्या निश्चित करा. चांगली विश्रांती आणि गाढ झोपेला प्रोत्साहन देणारे वातावरण तयार करा. दिवे मंद करा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून स्वतःला दूर ठेवत शांत झोपेसाठी वातावरण तयार करा.
हे सर्व केल्यानंतर तुमच्यामध्ये कोणते बदल झाले? हे आम्हाला info@srifamilyguide.com मेल आयडीवर कळवा.